क्राईमताज्या बातम्यारणधुमाळी

अखेर मलिक तुरूंगाबाहेर! सवोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; तब्बल दीड वर्षानंतर सुटका?

मुंबई : (Nawab Malik bail in Supreme Court) मनी लाँड्रिंग प्रकरणात मागील दीड वर्षापासून तुरुंगात असलेले महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले नवाब मलिक यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला.

महाविकास आघाड सत्तेत असतानाच मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित होतं.

दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेतली नाही. त्यामुळे मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात मलिक काय भुमिका घेतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये