ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

आर्यन खानला क्लीन चीट मिळाल्यावर नवाब मलिकांचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

मुंबई – NCB’s clean chit to Aryan Khan | मागील वर्षी जवळपास सहा ते सात महिने गाजलेल्या कॉर्डेलिया प्रकरणात (Cordelia Case) सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीकडून क्लीन चीट मिळाली आहे. आर्यन खानला क्लीन चीट (Clean chit to Aryan Khan) मिळताच यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणात एनसीबीच्या (NCB) तपासावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अशातच नवाब मलिक यांच्या ट्विटरवरून ट्विट करण्यात आलं आहे.

आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर पाच जणांना या प्रकरणात आता क्लीनचिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबी समीर वानखेडे, त्यांची टीम आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीविरोधात कारवाई करेल का?, की गुन्हेगारांना ते पाठिशी घालतील?, असा सवाल नवाब मलिकांच्या आफिसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत विचारण्यात आला आहे.

दरम्यान, एनसीबीकडून वगळण्यात आलेल्या नावांमध्ये आर्यन खान याच्यासह अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये