पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

नऊ महिला नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम

रांजणगाव गणपती : स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच आणि रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. 4) रोजी नवरात्री उत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ महिलांना सन 2022 चा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिरुर तालुक्यातील महिलांच्या समस्या सातत्याने आपल्या लेखणीद्वारे मांडणाऱ्या पत्रकार किरण पिंगळे यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी या नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते.

नवरात्र उत्सवात नऊ दिवस ग्रामीण भागातील महिला, युवती तसेच मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी लिंबू चमचा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभुषा, दांडिया स्पर्धा, गरोदर माता ओटीभरण, पाककृती स्पर्धा, होम मिनिस्टर, नृत्य स्पर्धा, नवदुर्गा पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु, गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे यंदा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. तसेच विविध स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडल्या. दि. 4 रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी शिरूर ग्रामीणचे सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनाही कार्यसम्राट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मानाची पैठणी स्नेहा जामदार, सोन्याची नथ सीमा चव्हाण, चांदीचे पैजण राणी कर्डिले यांना देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र खांडरे, अ‍ॅड. भंडारी, दादाभाऊ वाखारे, शिरुर ग्रामीणचे सरपंच नितीन बोऱ्हाडे, अादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये