अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

पॅनकार्डद्वारे तुमच्यावर ठेवली जाणार नजर? अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा..

नवी दिल्ली : (Nirmala Sitharaman presented the budget for 2023) गुरुवार दि. 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 चा मोदी सरकाने अर्थसंकल्प (Budget 2023-24) जाहीर केला. हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमाोर ठेवून साहाजिकच यामध्ये . सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा (Pan Card) वापर आता कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर याद्वारे नजर ठेवली जाणार का? असा सवाय यानिमित्ताने निर्माण होत आहे.

आतापर्यंत आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट अशा तत्सम कागदपत्रांनाच ओळखपत्र म्हणून वापरता येत होतं. पण यंदाच्या साली अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करुन सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर आता कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल, असं सांगितलं आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. ‘आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे, असं सीतारामन म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये