पवार म्हणाले “राणेंना बाईनं पाडलं…”, त्यांच्या या वक्तव्यावर नितेश राणेंनी झाडलं

मुंबई | Nitesh Rane On Ajit Pawar – खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिंदे गटावर सडकून टीका करताना दिसत आहेत. आता संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्विट केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणातला असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. यावर आता भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी मिश्किल शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित दादांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेनं केल्याचं विधान केलं आहे. “नारायण राणेंनीच शिवसेना (Shivsena) फोडली. सगळे पडले, राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईतील वांद्र्यात पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं बाईनं”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
यावर नितेश राणेंनी अजित पवारांवर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “अजितदादा मोठे नेते.. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे.. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले.. शाम सावंत सोडून.. माहिती असुदे दादा..बस या वेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा.”
तसंच “गेल्या वेळी बिचारा.. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला.. म्हणून ते काही होत का बघा.. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले.. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात.. तुमचा आवडता टिललु”, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.
One Comment