Top 5क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतरून नितेश राणेंनी सभागृहात सादर केले धर्मांतराचे रेट कार्ड

मुंबई – Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उचलून धरला. श्रीरामपुरमधील धर्मांतराचा मुद्दा मांडताना नितेश राणे यांनी धर्मांतराचे रेट कार्डच सभागृहात दाखवले. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात आहे. असा गंभीर आरोप करत, हिंदू धर्मातील मुलींना फसवून धर्मांतर केले जात असून धर्मांतर कायदा लागू करावा अशी मागणी राणे यांनी केली आहे.

श्रीरामपुरात एका अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून तिच्यावर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. २०१९ मध्ये १३ वर्षाच्या पीडितेला आरोपीने शाळेतून उचलून नेले होते. त्यानंतर तिचे धर्मांतर करून तिच्याशी निकाह करून तिच्यावर तीन वर्षांपासून अत्याचार केले गेले आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, नितेश राणे यांनी सानप यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे. तशीच मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर देताना बडतर्फीची प्रक्रिया मोठी असते. त्या प्रकरणाची पूर्ण तपासणी सुरु आहे. अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये