ताज्या बातम्यामनोरंजन

नोरा फतेगी प्रेग्नंट? व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मुंबई | बॅालिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी नोरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या नोरा ही ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती प्रेग्नंट आहे अशी चर्चा सुरु होती. आता यावर नोराने एक व्हिडाओ शेअर करत उत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर आता नोराने एक व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं आहे. या व्हिडीओमध्ये नोरा हा व्हिडीओ शूट करत असताना मध्येच मर्जी आणि नीतू कपूर येतात. यावेळी मर्जी बोलतो की “आम्ही प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या त्रासाविषयी बोलत आहोत, तर दुसरीकडे नोरा स्वत: कडे बघण्यात व्यस्त आहे.” यावर उत्तर देत नोरा बोलते, “कारण मी प्रेग्नंट नाही.” यावर मर्जी बोलतो की “संपूर्ण जगाला ही माहिती देण्यासाठी धन्यवाद.” तसंच नोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी असा अंदाज बांधत आहेत की कदाचित हे सर्व लोक नीतू कपूर यांची सून आलिया भट्टच्या प्रेग्नंसी विषयी चर्चा करत होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये