“फक्त मुलीच नाही तर काही मुलंही माझ्या प्रेमात…”, कार्तिक आर्यनचा मोठा खुलासा

मुंबई | Kartik Aryan – बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कार्तिक आता त्याचा आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यानं या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यानं मोठा खुलासा केला आहे.
कार्तिक आर्यनने अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत ‘द कपिल शर्मा शो’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्मानं कार्तिकला काही मजेशीर प्रश्न विचारले. यावर कार्तिकनंही त्याच्या अंदाजात उत्तरं दिली. कपिलनं कार्तिकला त्याच्या चाहत्यांबाबत प्रश्न विचारले असता कार्तिक म्हणाला, माझे भरपूर चाहते आहेत. तर कपिल शर्मा लगेचच म्हणतो मी ऐकलंय की अनेक मुली तुझ्या प्रेमात आहेत. याला उत्तर देताना कार्तिक म्हणतो, फक्त मुलीच नाही तर काही मुलं देखील माझ्या प्रेमात आहे. त्यानंतर कपिल म्हणतो काय मुलं पण? त्यावर कार्तिक म्हणतो हो सर आता तुम्हाला कसं सांगू…, कार्तिकचं हे उत्तर ऐकून सगळ्यांमध्ये एकच हशा पिकतो.
दरम्यान, ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा हा चित्रपट 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.