ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राष्ट्रवादी काॅंग्रेसची ओबीसी उमेदवारांसाठी मोठी घोषणा!

मुंबई : (OBC Reservation On State Election 27 % Jayant Patil Announcement) राज्य निवडणुक आयोगानं नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १७ जिल्ह्यातील तब्बल ९२ नगरपालिकांच्या निवडणुका आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. सादर केलेल्या परिपत्रकानुसार १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येतील.

दरम्यान, या पार्श्वभुमीवर  येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी घोषणा केली आहे. या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा न्याय मिळणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची ट्विट करुन त्यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये