ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पालखी सोहळ्यात फुगडी खेळताना आजींचा मृत्यू

पुणे | पालखी सोहळ्यानं संपूर्ण पुणे (Pune) पंढरीमय झालेले आहे. अशातच मंगळवारी सायंकाळी पुण्यात मुक्कामाला असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथ्री तालुक्यातल्या जवळा झुटा या खेडेगावातील श्रीमती कुशीवर्ता दगडोबा गिरी या 65 वर्षाच्या आजीचे फुगडी खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात फक्त त्यांचे पती दगडोबा गिरी आहेत.

कुशीवर्ता आजी आणि त्यांचे पती ही जोडी मागील 30 वर्षापासुन दरवर्षी वारी करते. यावर्षी मात्र दगडोबा यांना त्यांची पत्नी कायमची सोडून गेली. दगडोबा यांचा एकुलता एक मुलगा होता, जो काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू पावला. दरम्यान, आजींचा दिंडीतला शेवटच्या फुगडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये