ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पवनराजेंच्या मुलाशी सामना झाला अन् आगीशी का खेळू नये हे समजलं; ओमराजेंचा राणा पाटलांना हल्लाबोल…

उस्मानाबाद : (Omraje Nimbalkar On Jagjit Rana Patil) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी शनिवार दि. 03 नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीकविम्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकांना जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासमोर एकेरी भाषा वापरली. ‘तू औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची औकात आणि संस्कार सर्वांना माहीत आहे,’ अशा खरमरीत शब्दांत खासदार ओमप्रकाश यांनी राणा पाटलांना फटकारलं.

दोन लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या या हमरीतुमरीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलंच ढवळून निघालं. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या राड्यानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी फेसबुक एक पोस्ट लिहीत पुन्हा एकदा राणा पाटलांना डिवचलं आहे. ‘कलेक्टर कचेरीत पीकविम्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना एका आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सोन्याचा चमचा घेऊन व आजूबाजूला चमचे मंडळी ठेऊन सर्वांवर रुबाब करायची त्यांना सवय आहे.

आज आपल्या भाषणात ओमराजे म्हणाले, “पवनराजे” साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल. यांनी संस्कार बद्दल बोलावे म्हणजे पाकिस्तानने दहशवाद्यांविरोधात बोलावे असे आहे,’ अशा शब्दांत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेतून आमदार राणा पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांच्यावर मल्हार पाटलांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे जुना वाद आता पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये