आरोग्यताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी शहरात भव्य रक्तदान, नेत्रतपासणी शिबीर

नेत्र शिबिराला 250 लोकांनी आणि रक्तदान शिबिराला 75 लोकांनी सहभाग नोंदवला

Blood Donation Camp In Alandi : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday) खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहरात भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रदेश प्रतिनिधी डी.डी.भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश शेठ कुऱ्हाडे बरोबरच आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. तसेच, हा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित खेड तालुका उपाध्यक्ष श्री रोहन कुऱ्हाडे व आळंदी युवक अध्यक्ष सौरभ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. नेत्र शिबिराला 250 लोकांनी आणि रक्तदान शिबिराला 75 लोकांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी रोहन कुऱ्हाडे हे आळंदी शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “मागील काळात देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत. आता पक्षाने आम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीचे भान लक्षात घेता अजून मोठ्या उत्साहाने असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये