मनोरंजन

सर्जरीनंतर ‘या’ अभिनेत्रीचा चेहरा बिघडला; ओळखणंही झालं कठीण

गेल्या काही दिवसांपूर्वीच ऐका कन्नड अभिनेत्रीचा प्लास्टिक सर्जरीदरम्यान झालेल्या चुकीमुळे मृत्यू झाला होता. चेतना राज असं त्या अभिनेत्रीच नाव होत. २१ वर्षीय चेतनाने आपलं वजन कमी करण्यासाठी ही सर्जरी केली होती. परंतु ती तिच्या जीवावर बेतलं आहे. त्यानंतर आता एक बातमी समोर आली आहे. रूट कॅनाल सर्जरीनंतर कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा चेहरा ओळखेनासाच झाला आहे.

स्वाती सतीश या अभिनेत्रीने दातांच्या समस्येमुळे रूट कॅनाल प्रोसिजर करून घेतली आहे. त्याआधी तिला डॉक्टरांनी काही सर्वसामान्य साइड इफेक्ट दिसून येतील असं सांगितलं होत. परंतु २० दिवस झाले तरीही तिच्या चेहऱ्याची सूज कमी झाली नाही. तिच्या चेहऱ्याचा उजवा भाग जास्त प्रमाणात सुजला आहे. यामुळे तिने माध्यमांशी बोलताना क्लिनिकवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

दरम्यान, ती आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याचबरोबर स्वातीने निष्काळजीपणा केलेल्या क्लिनिकवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. कारण चित्रपटविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आपला चेहरा, सौन्दर्य अधिक प्रिय असते. यामुळे तिने आपला चेहरा नीट ओळखता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तसंच तिचा आगामी चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये