ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

Pune Flight: पुण्याहून दिल्लीकडे निघाले विमान अन् प्रवाशाच्या बॅगेत बॉम्ब; पुढे काय झालं वाचा तुम्हीच…

पुणे | Pune Flight : नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली अन् सगळ्यांची एकच धावपळ उडाल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री पुण्यातून दिल्लीला जाणारे विमान तयार झाले. त्यानंतर पुणे विमानतळावरून विमानाने टेकऑफ घेतले. दिल्लीला विमान रवाना होत असताना अचानक एका प्रवाशानं आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. त्यानंतर सर्व प्रवाशांची तारांबळ उडाली.

प्रवाशानं आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगताच याबाबतची माहिती तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर विमान मुंबईला लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये विमान लँड झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.

नेमकं घडलं काय?

शुक्रवारी रात्री पुण्याहून विमान दिल्लीला निघाले होते. त्यावेळी अचानक एका व्यक्तीनं आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. त्यामुळे तातडीनं विमान मुंबईत लँड करण्यात आलं. बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यामुळे मुंबई विमानतळावर सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली होती. विमान लँड झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. पण त्याच्या बॅगेमध्ये कोणतीही बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद अशी वस्तू सापडली नाही.

प्रवाशानं बॅगेत बॉम्ब असल्याची खोटी माहिती का दिली?

त्या व्यक्तीच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे कसलीही संशयास्पद वस्तू मिळाली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्या व्यक्तीनं आपल्या छातीत दुखू लागल्यामुळे आपल्याला तातडीनं वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आपण बॅगेत बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला उपचारासाठी पाठवले असून पुन्हा एकदा त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये