पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

अमृतमहोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा

पुणे : पुणे -भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी हवेली, तहसिलदार हवेली, गटविकास अधिकारी हवेली आणि गट शिक्षणाधिकारी, हवेली यांच्या वतीने शहरातील ४ केंद्रावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत ३२० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.’भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि गौरवशाली भारत : १९४७ ते २०२१’ हा विषय स्पर्धेसाठी देण्यात आला होता.

पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, भारतीय जैन संघटना कॅम्पस वाघोली, विस्डम इंग्लीश स्कूल हडपसर आणि भावे हायस्कूल सदाशिव पेठ, पुणे या केंद्रावर ही स्पर्धा घेण्यात आली. यातील प्रत्येक केंद्रात ३ अशा प्रकारच्या १२ चित्रांचे प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. यशस्वी स्पर्धकांना १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसिलदार तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के आणि गटशिक्षणाधिकारी हवेली राजेसाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये