क्रीडाताज्या बातम्या

“जर सूर्यकुमार यादव पाकिस्तानात असता तर…”, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत

इस्लामाबाद | Salman Butt On Suryakumar Yadav – भारतीय संघाचा (Team India) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात केवळ 51 चेंडूत 112 धावांची खेळी केली आहे. त्याचं हे टी-20 फाॅरमॅटमधील तिसरं शतक आहे. सूर्यकुमारच्या या उत्कृष्ट खेळीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) यानं देखील सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे.

जर सूर्यकुमार यादव पाकिस्तानात असता, तर तो राष्ट्रीय संघात पोहोचू शकला नसता. कारण आमच्या देशातील धोरणं काहीशी वेगळी आहेत त्यामुळे सूर्यकुमारला राष्ट्रीय संघात खेळणं शक्य झालं नसतं, असं सलमान बटनं म्हटलं आहे.

सलमान बटनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, मी एकेठिकाणी वाचलं होतं की, वयाच्या 30 व्या वर्षी सुर्यानं पदार्पण केलं आहे, तेव्हा माझ्या मनात विचार आला की, तो किती भाग्यवान आहे की तो भारतीय आहे. जर तो पाकिस्तानात असता तर त्याला या वयात खेळण्याची संधीच मिळाली नसती. कारण आमच्या देशात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना संघात पदार्पण करण्याची परवानगीच दिली जात नाही.

पुढे तो म्हणाला की, “सध्या संघात जे खेळात आहेत त्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र, वयाच्या तिशीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करणं मोठं आव्हानच आहे. सूर्यकुमारचा माइंडनेस आणि फिटनेस अप्रतिम आहे. तो प्रत्येक गोलंदाजाला आणि त्याच्या रणनितीला आधीच ओळखतो”, असंही सलमान बट म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये