‘गदर 2’ पाहिल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांचं थेट सनी देओलला चॅलेंज; म्हणाले, “हिम्मत असेल तर त्याने…”

Pakistani People Reaction On Gadar 2 – सध्या सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Amisha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तसंच त्यानं रेकॉर्ड ब्रेक कमाई देखील केली आहे. ‘गदर 2’ ला भारतीय प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे, पण सोबतच पाकिस्तानी प्रेक्षकांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी संतप्त होत थेट सनी देओलला चॅलेंज दिलं आहे.
पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही पाकिस्तानी चित्रपटप्रेमींनी ‘गदर 2’ हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतरचा पाकिस्तानी प्रेक्षकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानी प्रेक्षकांनी सनी देओलवर जोरदार टीका केली असून त्याला एक चॅलेंज देखील दिलं आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ‘गदर 2’वर एका पाकिस्तानी प्रेक्षकानं सनी देओलला चॅलेंज दिलं आहे. तो म्हणाला की, मी सनी देओलला पाकिस्तानमध्ये येण्याचं आमंत्रण देतो. हिम्मत असेल तर त्यानं पाकिस्तानात येऊन दाखवावं आणि इथल्या लोकांप्रमाणे वागावं.
दरम्यान, सनी देओलचा ‘गदर 2’ पाहिल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. या चित्रपटातील काही डायलॉग्सवर पाकिस्तानी प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसंच त्यांनी सनी देओलवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली आहे.