“महाविकासआघाडीची वेळ…”; मराठमोळ्या अभिनेत्याचं ट्विट चर्चेत!

मुंबई | Aroh Welankar Tweet In Discussion – सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. तसंच त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. तसंच एकीकडे राज्यात राजकीय घटनांना जोर आलेला असताना दुसरीकडे यावर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी अभिनेता आरोह वेलणकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तसंत त्याने यासंदर्भातलं एक ट्विट शेअर केलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर त्याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यावर आरोहने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय, असं मला वाटतं आहे. चला पाहू पुढे काय होतंय?” असे ट्विट आरोह वेलणकरने केलं आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न देखील केला आहे.