नाशिक नंतर बार्शीही हादरली! फटाक्याच्या फॅक्टरीचा भीषण स्फोट; 2 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

सोलापूर : (pangari village in Barshi taluka of solapur district Firecrackers Factory Blast) नवीन वर्षाच्या पहिल्याच (New Year 2023) दिवशी महाराष्ट्र हादरवून टाकणारी दुसरी बातमी सोलापूरमधून (Solapur news) समोर येत आहे. सोलापूर मधील बार्शीतील एका फटाक्याच्या फॅक्टरीचा भीषण स्फोट झाला आहे. (Firecrackers factory blast in barshi, solapur maharashtra) या स्फोटात २ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, ७ जण जखमी झाले आहेत. या घटनेतून अजून माहिती समोर येत आहे. मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.(Firecrackers factory blast in barshi, solapur maharashtra)
काहीच तासांपूर्वी नाशिक मधील इगतपुरी तालुक्त्यातल्या मुंढेगाव मधल्या एका कंपनीला भीषण आग लागली होती. त्यात देखील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जणांची माहिती अजून देखील समोर आलेली नाही. (jindal company fire igatpuri nashik)
बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. फटाका फॅक्टरी मध्ये 40 हून अधिक कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक विभागाने माहिती दिली आहे. स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी झाल्याची स्थानिकांनी सांगितले आहे.
बार्शी आणि नाशिक मधल्या आगीच्या दोन घटनामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात हळहळ वक्त केली जात आहे.