“ही गोष्ट खूप लोकांना माहित नाही की…”, पंकज त्रिपाठींनी सिद्धार्थ शुक्लाबाबत केला ‘तो’ खुलासा

मुंबई | Pankaj Tripathi Talk About Sidharth Shukla – बाॅलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या उत्तम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आज त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल. पंकज यांची खूप मोठी फॅन असल्याचं शहनाजने स्वतःच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. तसंच पंकज यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबतच एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत त्यांनी एक खुलासा केला आहे.
कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांना शहनाजने तुमचं तोंडभरून कौतुक केलं असं सांगण्यात आलं. तेव्हा त्यांनी शहनाजचे आभार मानत सिद्धार्थ शिक्लाचाही उल्लेख केला. “हो, अभिनेता म्हणून शहनाज गिलला मी आवडतो. त्यासाठी मी तिचा आभारी आहे. तुम्ही आता शहनाजबद्दल बोललात आणि मला सिद्धार्थ शुक्लाची आठवण आली. सिद्धार्थ शुक्ला माझा खूप आदर करायचा. ही गोष्ट खूप लोकांना माहित नाही आणि मी कधी सांगितली नाही. आमच्या दोघांचं एकमेकांशी चांगलं नातं होतं.” असं पंकज त्रिपाठी सांगितलं.
दरम्यान, पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटात किंवा वेबसीरिजमध्ये साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावते. तसंच आता ‘क्रिमिनल जस्टिस 2’ या वेबसीरिजमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.