पंकजा मुंडेंना वडील गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच अश्रू अनावर, म्हणाल्या…
मुंबई | Pankaja Munde Emotional After Seeing Gopinath Munde Photo – सध्या झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. तसंच हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत देखील आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सहभागी झाल्या होत्या. आता येत्या भागात या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे सहभागी होणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे. तसंच झी मराठीने बस बाई बस कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. यात सुबोध भावे हे पंकजा मुंडे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधताना दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंनी विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी कार्यक्रमातील एका खेळादरम्यान पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो पाहताच त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना तुम्हाला काय बोलायचं ते बोला, असं सांगितलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर टाकायला नको होतं.
दरम्यान, पंकजा मुंडेंना दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी फ्लिमी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू.”