“…म्हणून लोक मलाही धर्मरक्षक म्हणतात”; संजय गायकवाडांनी दिले स्पष्टीकरण, ‘जाणता राजा’ वरून शरद पवारांवरही साधला निशाणा

Buladhana : (Sanjay Gaikwad On Dharmaveer, Ajit Pawar Amol Mitkari And Sharad Pawar) “छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक आहेत.” विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar यांनी हे वक्तव्य केल्यापासून महाराष्ट्राचं राजकरण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. भाजप आणि शिंदे गतातील नेते अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचे समर्थन करत “आजकाल भाजपचे अनेक नेते आपल्या नावापुढे धर्मवीर लावतात, त्यामुळे संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणता येणार नाही.” असं वक्तव्य केलं आहे. (Sanjay Gaikwad On Ajit Pawar on Dharmaveer Maharashtra Politics Marathi news)
दरम्यान, बुलढाण्याचे संजय गायकवाड यांना देखील लोक धर्मवीर म्हणून बोलतात. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर आहेतच पण त्यांनी अनेक यातना सहन करून बलिदान दिले मात्र, धर्म सोडला नाही. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. ते धर्मवीर नव्हते म्हणणारे अजित पवार आणि अमोल मिटकरी आहेत कोण? धर्मवीर आनंद दिघे साहेब किंवा मी, आम्ही कधीही स्वतः आमच्या नावापुढं धर्मवीर नाही लावलं. आमच्या कामाकडे बघून लोक स्वतः धर्मवीर बोलतात त्यात आमचं काय दोष. शरद पवारांना जाणता राजा बोलतात, मग ते जाणता राजा आहेत काय? आम्ही २२२ मुलींना लव्ह जिहादच्या विळख्यातून बाहेर आणलं आहे. धर्मांतरीत केलेल्या मुली मी परत आणल्या आहेत. जेव्हा जेव्हा जिल्ह्यात जातीय दंगली घडतात तेव्हा तेव्हा मी हिंदू लोकांचं रक्षण केलं आहे. त्यामुळं लोक स्वतः आम्हाला धर्मवीर म्हणतात. आम्ही स्वतः थोडच लिहितो धर्मवीर संजय गायकवाड? लोकांना वाटत यांना उपाधी द्यावी म्हणून ते त्यांना वाटेल ते देतात. त्यात आमचा काय दोष आहे?” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी टीव्ही 9 च्या पत्रकारांशी बोलताना दिली आहे.