क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताला धमकी देणं पडलं महागात, PCB अध्यक्ष रमीज राजांची हाकलपट्टी

मुंबई | Ramiz Raja – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांना भारताला धमकी देणं चांगलंच महागात पडलंय. रमीज राजा यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी (Najam Sethi) यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

इंग्लंड मालिकेदरम्यानच माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटानं रमीज राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. या गटानं पडद्यामागे काही खेळ खेळला जात असल्याचा दावा केला होता. तसंच पीसीबीमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयानं बोर्डाचे संरक्षक पंतप्रधान यांचीही भेट घेतली होती.

इम्रान खान यांच्या पक्षानं 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळविलं. तेव्हा नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पीसीबी बोर्डाच्या घटनेनुसार, पंतप्रधान अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती करतात. यानंतर, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. 2021 मध्ये रमीज राजांना पीसीबीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर रमीज राजांची खुर्ची जाऊ शकते, असं मानलं जात होतं. मात्र, रमीज यांनी आपली खुर्ची बराच काळ टिकवण्यात यश मिळवलं. तसंच आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची खराब कामगिरी आणि अनेक आरोपांनंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह हे 2023च्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याबाबत बोलले होते. 2023 आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. आशिया चषक एका तटस्थ ठिकाणी खेळवला जावा असं जय शाह यांनी म्हटलं होतं. मात्र, यानंतर रमीझ राजांनी धमकीचे विधान केलं की, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळण्यासाठी आला नाही तर पाकिस्तानही वनडे वर्ल्ड कपमध्ये भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये