पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचे निधन, ट्विटरचा ट्रेंड अन् चर्चा काश्मीरच्या स्वातंत्र्याची
Pervez Musharraf Passed Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे वयाच्या 79 वर्षी निधन झाले. मुशर्रफ हे दीर्घकाळपासून आजारी होते. 2016 पासून दुबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना ‘अमायलोइडोसिस’ हा आजार झाला होता. त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले होते. ते अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते.
मागील वर्षी जूनमध्ये परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती, त्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. मात्र, नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. आता मुशर्रफ यांचे खरोखरच निधन झाल्याने लोक पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विटरवर #PervezMusharraf हा टॉप ट्रेंडिंग आहे. मात्र, यादरम्यान काही युजर्स असे आहेत ज्यांनी ट्विटरवर एक वेगळीच चर्चा सुरू केली आहे. कुणी ‘बड़ा लेट कर दिया उपरवाले’ म्हणतंय, तर कुणी म्हणतंय की ‘काश्मीर स्वतंत्र असतं तर यांना पाहता आलं असतं.”