देश - विदेश

बिहारमधील पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

बिहारमध्ये १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यासाठी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बिहारमधील छठ पूजेचा दाखला देत दाखल केलेल्या याचिकेत बिहारमधील पोटनिवडणुकीची तारीख १३ ऐवजी २० नोव्हेंबर करण्याची मागणी केली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सोमवारी ११ नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. बिहारमधील तरारी, रामगढ, बेलागंज आणि इमामगंज या चार विधानसभा जागांवर १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने पंजाब, केरळ आणि उत्तर प्रदेशमधील १४ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये बदल जाहीर केला होता. मोठ्या प्रमाणात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा दाखला देत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, या विधानसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर ऐवजी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसोबत २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये