नीतेश राणेंकडून खैरेंचे पैसे वाटताना छायाचित्र
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील बहुचर्चित सभेत विविध मुद्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनी ठाकरे यांनी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिमांचा द्वेष करायचे कधी सांगितले नाही. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा, असे शिवसेनाप्रमुखांना सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सभेनंतर मनसे आणि भाजपनेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
मात्र, या सभेसाठी कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मनसेचे संदीप देशपांडे आणि कोकणातील आमदार नीतेश राणे यांनी छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पैसे देत असल्याचे दिसते. यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
हे आरोप झाल्यानंतर खैरे यांनी सर्व गोष्टी फेटाळल्या आहेत. नीतेश राणे यांना मी वडीलधारा आहे. त्यांनी किमान वय पाहून आरोप करावे, असे खैरेंनी म्हटले. तसेच हे छायाचित्र जुने आहे.