क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश

बुलढाणा दुर्घटनेवर PM मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर

बुलढाणा : (PM Narendra Modi Tweet In Buldhana accident) बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण बस अपघातात 25 प्रवाशांचा होपपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बुलढाणा येथिल झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यानंतर PMO यांच्याकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.

बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये