ताज्या बातम्यादेश - विदेशपुणे

पुण्यात PMPML बसची वाहनांना मोठी धडक

पुणे | Accident News – वाकडेवाडीत काल 28 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मोठा अपघात झाला. या अपघातात तीन चारचाकी वाहनं आणि दोन मोटारसायकलला PMPML बसने धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

PMPML बसच्या चालक आणि वाहकाचे नाव अद्यापही समजलेले नाही.  या अपघातामध्ये कारमध्ये मागे बसलेली महिला जखमी झाली असून या महिलेवर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर दुचाकीवरील जखमी व्यक्तीला जहांगीर रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. एक टेम्पो आणि 407 या वाहनांचे नुकसान झाले आहे. पीएमपीएमएल बसने 200 ते 300 मीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. पण 407 वाहनामुळे बस थांबली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये