ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राज्यात चाललंय तरी काय? सरकार असताना, सचिवांना मंत्र्यांचे आधिकार!

मुंबई : (Powers of Ministers to Secretary) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थित भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदेच्या बंडखोरीने शिवसेना आणि शिंदे गटातील वादाचे प्रकारण सर्वोच्च न्यायालयात गेले. यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? असा प्रश्न पडलेला असताना दोन्ही गट शिवसेनेनर दावा करत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला आहे. न्यायालयाच्या ‘तारीख पे तारीख’मुळे पेच प्रसंग आणखीन वाढताना दिसत आहेत. विरोधकांकडून यावर जोरदार टिकास्त्र सोडले जात आहेत.

राज्यातील लांबलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेचे काही कामे आडू नयेत म्हणून मंत्र्यांचे सर्व आधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामे देवून घरी बसावे आणि त्यांचेही आधिकार सचिवांना द्यावेत असं पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये