ताज्या बातम्यामनोरंजन

प्राजक्ता माळीचं अनोखं चॅलेंज; म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत करणार असाल तर…

मुंबई | Prajkta Mali’s Challenge – सध्या मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच प्राजक्ताची ‘रानबाजार’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. तसंच तिचा ‘वाय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रानबाजार या वेब सिरिजमध्ये प्राजक्ताने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तीला प्रचंड मेहनत करावी लागली. तितकेच तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले आहे. तर आता ‘वाय’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ताने कंबर कसली आहे. या चित्रपटातही तिने अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर प्राजक्ता आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. आताही तिने एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे.

उत्तम अभिनयाप्रमाणेच प्राजक्ता आणि योग साधना हेही एक समीकरण आहे. प्राजक्ता बऱ्याचदा आपले योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. असाच एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांना एक चॅलेंज दिलं आहे. प्राजक्ताने या व्हिडिओ मध्ये चक्क १०८ सूर्य नमस्कार घातले आहेत. विशेष म्हणजे न थांबता आणि न थकता प्राजक्ताने सूर्यनमस्कार घातले आहेत. तर सोबत तिने या व्हिडीओला एक भन्नाट कॅप्शन देखील दिले आहे.

प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘१०८ सूर्यनमस्कार.. (जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो.) कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर … काय म्हणता, करणार का? (जमेल तितके करा…) (सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत… हा मैसूर style हट सूर्यनमस्कार आहे. )’ असं म्हणत तिने चाहत्यांना योगा दिनानिमित्त सूर्यनमस्कार घालण्याचं चॅलेंज दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये