“या घटनेनं संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली…”; मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

मणिपूर | Manipur Viral Video – मणिपूरमध्ये (Manipur) अत्यंत संतापजनक असा प्रकार घडला आहे. दोन महिलांची जमावाने नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना 4 मे 2023 रोजी मणिपूरमधील थौबार जिल्ह्यात घडली आहे. तसंच दोन महिने उलटूनही आरोपींना अटक केलेली नाहीये. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातनू तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “या घटनेनंतर माझं मान रागाने भरलं आहे. जी घटना अत्यंत लज्जास्पद आहे. यामध्ये गुन्हे करणारे, पाप करणारे किती आणि कोण आहेत याचा तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या घटनेनं संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली आहे.”
“देशवासीयांना मी विश्वास देऊ इच्छितो की, या प्रकरणातील कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कायदा हा आपल्या पूर्ण शक्तीनिशी कठोरपणे पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडलं आहे त्याला कधीही माफ केलं जाऊ शकत नाही”, असंही मोदींनी स्पष्ट केलं.