ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

राष्ट्रपती निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क!

नवी दिल्ली : (Prime Minister Narendra Modi voted) होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्याने विशेष महत्व आहे. देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळणार असून त्यांचं सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी म्हणाले, हा सध्याचा कालखंड फार महत्वाचा आहे. त्याबरोबर देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरं होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा? किती वेगाने करावा? कोणती नवी उंची गाठावी? याचा संकल्प करण्याचा आहे. त्यासाठी संसद देशाला दिशा देईल असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. देशाला नवी ऊर्जा देण्याचं कारण ठरण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे असंही ते म्हणाले. आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होत असून त्याआधी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू यांना सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) उमेदवारी दिली. त्यांचा सामना (युपीए) चे उमेदवार आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री ८४ वर्षीय यशवंत सिन्हा यांच्याशी आहे. अर्थात संख्याबळ पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. तसं झाल्यास मुर्मू या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरणार आहेत. या मतदानाचे निकाल २१ जुलैला रोजी लागणार असून, २५ जुलैला रोजी शपथविधीला होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये