देश - विदेशरणधुमाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढच्या २५ वर्षांचं लक्ष्य साध्य करण्यााचा भाजप नेत्यांना कानमंत्र!

नवी दिल्ली – भाजपनं लोकांची विचार करण्याची पध्दत बदलली तरी मुख्य मुद्यांपासून देशाचं लक्ष विचलित करण्याकडं काही पक्षांची सारी ‘इकोसिस्टिम’ काम करत आहे. त्यांच्या जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट’ न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी व पुढच्या २५ वर्षांचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला अग्रेसर रहायचं आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना विजयाचा नवा मंत्र दिला. जयपूरमधील लीला पॅलेस हॉटेलमध्ये भरलेल्या भाजपच्या राष्ट्रीय बैठकीच्या पहिल्या दिवशी मोदींनी देशभरातील १३२ पक्षनेत्यांना संबोधित केले. मोदींनी दिल्लीतूनच आॅनलाईन भाषण केले व त्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.

दरम्यान, रविवारी (ता. २१) ते या बैठकीला पुन्हा मार्गगदर्शन करणे अपेक्षित आहे. हिंदुस्तानाच्या प्रत्येक नागरिकाला सरकारडून काम काय केले याचा हिशोब अपेक्षित असतो. सरकार काय काम करत आहे, हे तो पाहू इच्छितो आणि त्या कामाचे परिणामही डोळ्यादेखत झाले पाहिजेत असे सांगतो. भारतीय जनता पक्षाने लोकांच्या विचारसरणीत केलेला हा बदल सर्वांत सकारात्मक बदल आहे असे आपण मानतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले की देशवासीयांच्या आपल्याकडून वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता भाजप कार्यकर्तांनाही बदलाची प्रक्रिया आणखी गतिमान करावी लागेल

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये