देश - विदेश

“देशाच्या अकात्मतेसोबत कसलीही तडजोड नाही,… “; धार्मिक हिंसाचारांदरम्यान पंतप्रधानांच मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : सध्या देशातल्या अनेक राज्यांत धार्मिक हिंसेच्या अनेक घटना घडत आहेत. कर्नाटक नंतर पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्र आणि काळ दिल्लीतील जहांगीरपूर मधील घातला गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नागरी सेवा दिवसानिमित्त दिल्लीतल्या एका सभेला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.

भारत आपल्या एकता आणि एकात्मतेसोबत कोणतीही तडजोड करणार नाही, आम्ही एक लोकशाही राष्ट्र आहोत. सध्या आमच्यापुढे तीन आव्हानं आहेत – समानता, जागतिकीकरण आणि भारताची एकता. असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते म्हणाले की, “आम्ही कधीही भारताच्या एकतेसोबत तडजोड करू शकत नाही. हे आमचं आणि प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे.” मात्र दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील हिंसाचार प्रकरणी काहीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये