ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

तुनिषा शर्मा प्रेग्नंट होती, शिझानने लग्नाला दिला नकार दिला; ‘या’ अभिनेत्रीचा दावा…

मुंबई : (Priti Taneja On Sheezan Mohammad Khan) छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) रविवार दि. 24 डिसेंबर रोजी ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ (Ali Baba : Dastaan-E-Kabul) या मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान मोहम्मद खान (Sheezan Mohammad Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणतं वळणं लागतंय ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘मॅडम सर’ फेम प्रीती तनेजाने (Priti Taneja) दावा केला आहे की, “तुनिषा आणि शिझान रिलेशनध्ये होते. तुनिषा प्रेग्नंट असल्याने तिने शिझानकडे लग्नाची मागणी केली होती. पण शिझानने लग्नाला स्पष्ट नकार दिला. तरीदेखील तुनिषा त्याला लग्नासाठी विचारत राहिली पण शिझान मात्र लग्नाला नकार देत राहिला”. त्यामुळे तुनिषाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तिने म्हटलं आहे.

‘अली बाबी दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर तुनिषा शर्मा आणि शिझानची भेट झाली होती. या मालिकेच्या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर ती नैराश्येत गेली. अखेर 24 डिसेंबर 2022 रोजी तिने आत्महत्या करत आयुष्य संपवल्याचे आरोप प्रितीने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये