आरोग्यइतरताज्या बातम्यादेश - विदेश

पारंपरिक औषधांच्या प्रगतीला चालना

आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी एक अद्वितीय व्यासपीठ

ही जागतिक शिखर परिषद पारंपरिक आणि पूरक औषधांच्या क्षेत्रात संवाद, कल्पनांची देवाणघेवाण, सहयोग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी एक अद्वितीय व्यासपीठ सादर करते.

पारंपरिक औषधांसाठीची जागतिक परिषद, आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाला चालना देत आशेचा किरण म्हणून काम करत आहे. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा अंगीकार करून, ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वाला चालना देत आरोग्य-संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू शकतो.

“सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणाच्या दिशेने” या संकल्पनेवर आधारित ही परिषद दोन दिवस झाली. गंभीर आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जागतिक आरोग्य तसेच शाश्वत विकासामध्ये प्रगती करण्यासाठी पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधाच्या भूमिकेचा परिषदेत शोध घेतला गेला.

ही जागतिक शिखर परिषद पारंपरिक आणि पूरक औषधांच्या क्षेत्रात संवाद, कल्पनांची देवाणघेवाण, सहयोग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी एक अद्वितीय व्यासपीठ सादर करते. शतकानुशतके, पारंपरिक आणि पूरक औषधांनी वैयक्तिक आणि सामुदायिक आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधुनिक काळातही, नैसर्गिक आणि वनौषधी-आधारित औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांची मागणी पारंपरिक उपचारपद्धतींचे शाश्वत महत्त्व अधोरेखित करते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे मुख्यालय गुजरातमधील जामनगर येथे आहे. हे केंद्र एक ज्ञान केंद्र म्हणून काम करते. लोकांच्या आणि वसुंधरेच्या भल्यासाठी आधुनिक विज्ञानाशी प्राचीन ज्ञानाचा समन्वय साधते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य कार्यांना पूरक काम करत, जागतिक स्तरावर पारंपरिक औषधांच्या प्रगतीला हे केंद्र गती देते.

पारंपरिक औषधांसाठीच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेला खूप महत्त्व आहे. कारण ही परिषद सीमांच्या कक्षांपलीकडे जाते, आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी मनांना एकत्र आणते आणि जागतिक स्तरावर आरोग्यसेवेतील एका नवीन युगाच्या पहाटेचे दर्शन घडवते. या शिखर परिषदेमुळे पारंपरिक औषधांमध्ये सहकार्यासाठी संभाव्य क्षेत्रे ओळखण्यात आणि नवीन शोधण्यात मदत होईल आणि वैश्विक आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पारंपरिक औषधांचा वापर करण्यात मदत होईल. सांस्कृतिक विविधतेचा सन्मान, समुदायांचे सशक्तीकरण आणि आपला सामायिक वारसा साजरा करण्यात पारंपारिक औषधे मोठी भूमिका बजावू शकतात.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत सार्वत्रिक आरोग्याची व्याप्ती वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांची उद्घाटन सोहळ्यात प्रशंसा करण्यात आली. देशातील प्राथमिक आरोग्यसेवांचा विस्तार होत आहे. भारताने टेलीमेडिसिनचा अवलंब केल्याचेही अधोरेखित करण्यात आले. टेलीमेडिसिन केवळ आरोग्य सेवा वितरणाचा विस्तार करत नाही तर रुग्णांसाठी वेळ आणि पैसा वाचवण्यास मदत करते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी गांधीनगर येथे पारंपरिक औषधांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन केले. त्या समारंभावर आधारित…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये