सेवाज्येष्ठतेनुसार मिळाली पदोन्नती

पोलिस दलाचा पाया असून दिवस रात्र रस्त्यांवर उभे राहून जनतेच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असतात. अशा वेळी त्यांच्या कामाचे कौतुक करून मनोबल वाढविल्यास त्यांना अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावता येईल.
— अंकुश शिंदे
पोलिस आयुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ६२ पोलिस अंमलदारांना पदोन्नती व १ अधिकारी व ९ पोलिस अंमलदार निवृत्त झाल्याने त्यांचा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सत्कार केला. शिंदे यांनी जे पोलिस अंमलदार त्यांचे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशा सर्व पोलिस अंमलदारांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्याबाबत कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी यांना आदेश दिले होते.
सेवा ज्येष्ठतेनुसार अधिकारात वाढ
आयुक्तालयाच्या आस्थापनेवर नेमणुकीस असलेले एकूण ६२ पोलिस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली. सात पोलिस अंमलदारांची पोलिस हवालदार ते सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती. ४७ सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना श्रेणी पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने आयुक्तालयाचे आस्थापनेवर नेमणुकीस असलेले एकूण ६२ पोलिस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली असून, यामध्ये पदोन्नती मिळालेल्या पोलिस अंमलदारांपैक्की ४७ सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना श्रेणी पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ७ पोलिस अंमलदार यांची पोलिस हवालदार ते सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. असे एकूण ६२ पोलिस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यावेळी पोलिस आयुक्त शिंदे यांनी अंमलदार हे पोलिस दलाचा पाया असून, दिवसरात्र रस्त्यांवर उभे राहून जनतेच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असतात.
अशावेळी त्यांच्या कामाचे कौतुक करून मनोबल वाढविल्यास त्यांना अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावता येईल. या अनुषंगाने सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशा सर्व पोलिस अंमलदार यांनी समाजासाठी उत्कृष्ट काम करून जागतिक स्तरावर लौकिक मिळविणार्या महाराष्ट्र पोलिस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासून पोलिस दलाचे नाव उंचवावे, असे गौरवोद्गार करीत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच जे पोलिस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले अशा सर्व अधिकारी, अंमलदार यांना पोलिस दलात सेवा दिल्याबद्दल पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.