ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

‘मिशन अग्निपथ’ विरोधातल्या आंदोलनान घेतल हिंसक रूप; आंदोलकांनी संपूर्ण रेल्वेच पेटवली

पटना- Mission Agnipath | मंगळवारी केंद्र सरकारने सैन्यदलातील भरती प्रक्रिया बदलून ‘मिशन अग्निपथ’ (Mission Agnipath) नावाची एक नवीन योजना भरतीसाठी लागू केली आहे. मात्र ती योजना सैन्य भरतीची (Army) तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मान्य नसल्यान देशभरातील अनेक ठिकाणी भरतीची तयारी करत असलेले मुलं आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकार दखल घेत नसल्यानं आंदोलनांनी हिंसेचं रूप धारण केलं आलं आहे.

सरकारच्या मिशन अग्निपथच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशीपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. अनेकठिकाणी रल्वे स्थानकांवर दगडफेक देखील केली जात आहे. उत्तर भारतातील हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार मध्ये या योजनेविरोधात आंदोलन केले जात आहेत. बिहारमध्ये या आंदोलनाने आता हिंसक स्वरूप धारण केलं आहे. आंदोलकांनी संपूर्ण रेल्वेलाच आग लावल्याची घटना बिहारमधल्या लखिसरायमध्ये घडली आहे. या आगीत गाडीचे एकूण 12 डब्बे जाळून खाक झाले आहेत. दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यूही यात झाल्याची घटना समोर आली आहे.

देशातील अनेक ठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यामुळं उत्तर भारतातल्या अनेक भागातल्या तब्बल 200 गाड्यांच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या आहेत. आंदोलकांना रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी शांतता राखण्यासाठी आवाहन केलं आहे. अग्निपथ विरोधात आंदोलन ही विरोधी पक्षाची खेळी असल्याचं केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी म्हटले आहे.

मंगळवारी केंद्र सरकारने मिशन अग्निपथ नावाची योजना सैन्य भरतीसाठी लागू होत असल्याचा निर्णय दिला. या योजनेनुसार प्रत्येक नवीन सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना चार वर्षे नोकरी करता येणार आहे. त्यानंतर त्यांना निवृत्ती दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी ४६००० नवीन तरुणांची भरती केली जाणार आहे. आणि त्यापैकी चार वर्षांनी २५ टक्के सैनिकांना कायम ठेवले जाणार आहे. आणि उर्वरितांना निवृत्त केले जाणार आहे. निवृत्तीच्या वेळी त्यांना अकरा लाख रुपये देखील दिले जाणार आहेत. मात्र निवृत्तीनंतर तरुणांनी काय करायचे याचे उत्तर नसल्याने तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये