ताज्या बातम्या

राज ठाकरे यांचं अरेस्ट वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द

परळी | Raj Thackeray –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट ( Raj Thackeray Arrest Warrant ) जारी केला होता. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता परळी कोर्टात हजर राहिले होते. त्यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राज ठाकरेंना अनेकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असतानाही ते वारंवार गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट ( Raj Thackeray Arrest Warrant ) जारी करण्यात आला होते. मात्र याप्रकरणी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचं अरेस्ट वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे.

पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी

राज ठाकरेंना ऑक्टोबर 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनसैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसवर दगडफेक केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. 3 आणि 12 जानेवारीला राज ठाकरेंना कोर्टात ( Parali Court ) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पण ते कोर्टात हजर राहिले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं होत. राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट ( Raj Thackeray Arrest Warrant ) जारी केलं होतं. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे आज परळी कोर्टात ( Parali Court ) हजर राहिले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे. 500 रुपयांचा दंड हा राज ठाकरेंना ठोठावण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये