Top 5ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

भयानक ! पुण्यात होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील रावेत (Ravet Pimpri Chinchwad) भागामध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर वादळी वाऱ्यामुळे पार्किंग मध्ये उभा केलेल्या दुचाकी देखील खाली पडल्याचे पाहायला मिळाले. (Five people dead while two others injured after an iron hoarding board collapsed in Ravet Kiwle area of Pimpri Chinchwad city in Pune district)

दरम्यान या रावेत भागात होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सांयकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते. पैकी ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली.

सोमवारी सायंकाळी किवळे, देहूरोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस झाला. यामुळे अनेक नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी होर्डींगच्या आडोशाला थांबले होते. वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले. या होर्डिंगच्या खाली थांबलेले काहीजण त्याखाली अडकले. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात स्टेशन परिसरात देखील होर्डिंग कोसळून अपघात झाला होता

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये