ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ! मानहानीचा दावा शिरुर न्यायालयाकडून स्वीकृत…

मुंबई : (Mehboob Shaikh On Chitra Wagh) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर केलेला मानहानीचा दावा शिरुर न्यायालयाकडून स्वीकृत करण्यात आला आहे. त्यानंतर शेख म्हणाले, चित्रा वाघ यांनी स्वत: न्यायाधीश असल्यासारखं बेताल वक्तव्य केलं आणि आपली बदनामी केली, त्यामुळे त्यांच्याविरोधात आपण कायदेशीर लढाईचं पहिलं पाऊल टाकलं आहे असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे याचेही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल. चित्रा वाघ यांनी शिरूर कासार येथे येऊन माझ्याविषयी जी बदनामीकारक वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्याच्यानंतर शिरूरच्या न्यायालयामध्ये कलम 499 आणि 500 प्रमाणे क्रिमिनल डीफामेशनची खाजगी तक्रार दाखल केली. माननीय कोर्टाने 202 प्रमाणे पोलीस चौकशी करून त्या पोलिस चौकशीच्या अहवालानंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन ते स्वीकृत केले आहे.

काही लोक जे स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खूप शहाणे असल्याचं समजतात. त्या लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल, आज कोर्टाने त्याची दखल घेतली आहे. स्वतःला अतिहुशार समजणाऱ्यांना आणि लोकांची बदनामी करत बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निश्चितपणाने कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये