Top 5पुणे

सिद्धू मुसेवाला प्रकरणाचं पुणे कनेक्शन, फोटोवरून पटली ओळख!

पुणे – Pune connection of Sidhu Musewala case | पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाच्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. सिद्धूला ज्या 8 शुटर्सने गोळ्या घातल्या होत्या त्या 8 जणांपैकी दोघांची ओळख पटली आहे. (Pune connection of Sidhu Musewala case)

आठ शुटर्सपैकी दोन शूटर्स हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील असून संतोष जाधव (Santosh Jadhav & Saurav Mahakal) आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावं असल्याची माहिती समजत आहे. दोन्ही आरोपी हे पुण्यातील (Pune) रहिवाशी आहेत. त्यासोबतच 3 शूटर्स पंजाबमधील, 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर हा राजस्थानमधील होता.

दरम्यान, पंजाब पोलिसांनी पुण्यातून आज सकाळी संतोष आणि सौरव महाकाळला अटक केली आहे. 29 मेला संध्याकाळच्या सुमारास सिद्धूला गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये