क्राईमताज्या बातम्यापुणे

मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पुण्यात महिला कंडक्टरचा विनयभंग

पुणे | विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime News) महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले आहे. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिलांचे वावरणे कठीण झाले आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीएमपीएमएल (PMPML) डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Pune Police) सोमवारी दिली आहे.

सुनील धोंडीभाऊ भालेकर (वय ४३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला ही पुण्यातील पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. आरोपी सुनील भालेकर हा तिच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी आहे. तो मागील दोन महिन्यापासून महिलेचा पाठलाग करत होता. मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे हातवारे करून, शिट्टी मारून तिला कामावर असताना ,’ तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, मला तू खूप आवडतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर’ असे बोलून तिचा विनयभंग करून शिवीगाळ व धमकी दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये