पुण्यात अत्यंत लाजिरवाणी घटना; प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ केले व्हायरल

पुणे | शहरात (Pune Crime) दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आणखी येक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणी काळभोर परिसरात अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील लोणी काळभोर येथे प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरण केल्यानंतर 24 वर्षीय बहिणीला विवस्त्र करून खोलीत डांबून ठेवून मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी समाजमाध्यमावर ते व्हिडीओ प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
ही घटना 26 ते 29 जानेवारी रोजी घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.