ताज्या बातम्यापुणे

फोन न उचलल्याने माथेफिरू मजनू पोहोचला थेट लैलाच्या घरी आणि…

पुणे | प्रेयसीने प्रेमप्रकरण तोडल्याने प्रियकराला राग आला. तसेच त्याची प्रेयसी त्याचा फोन उचलणे बंद करू लागली. तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. प्रेमात वेड्या झालेल्या या प्रियकराने थेट प्रेयसीचे घर गाठले. पुण्यातील खडकी भागात हा प्रकार घडला आहे. प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने तिच्या घरासमोर जात प्रेमवेड्याने गोंधळ घातला.

प्रियकराने प्रेयसीला फोन करून सोसायटीच्या आवारात येण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी वैतागून प्रेयसीने थेट खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खडकी पोलिसांनी तरुणाला बोलावून घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

या दोघांमध्ये दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रियकर हा 41 वर्षांचा तर प्रेयसी ही 29 वर्षांची आहे. काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने काही कारणाने प्रेयसी प्रियकरावर रुसली होती. त्यांचा संवाद थांबल्याने प्रियकराला राग आला. त्याने संपर्क साधला असता तिने प्रतिसाद न दिल्याने प्रियकराचा रागाचा पारा आणखीनच वाढला. त्याने थेट तिचे घर गाठले आणि तिच्या सोसायटीच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये