पुणेमनोरंजन

‘सूरज हुआ मधम’ या सदाबहार मनपसंत गीतांचा विसावा भाग संपन्न

पुणे | “नागण्णा झळकी आयोजित ‘सूरज हुआ मधम’ या सदाबहार मनपसंत गीतांचा विसावा भाग नुकताच बालगंधर्व रगमंदिर येथे संपन्न झाला. यामध्ये एलिजाबेथ वाळंज आणि रवींद्र शाळू यांचा विशेष सहभाग होता. त्याचबरोबर पुण्यातील कलाकार केतकी जाधव, कविता कोठारी, सुनीला कविटकर, मनोज खंडेलवाल, विजय काळे, राजेंद्र आणि भारती ललगुणकर, रुची महंते, सभ्यासाची घोष, साधना शर्मा, स्मिता कुलकर्णी आणि लता रामप्रसाद यांनी हिंदी आणि मराठी गाणी सादर केली. “दीलबर मेरे” या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एलिझाबेथ वाळंज आणि विजय काळे यांनी गायलेल्या “केह दू तुम्हे” या गीताला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. तसेच रविंद्र शाळू आणि स्मिता कुलकर्णी यांनी गायलेल्या “सप्नात रंगले मी” आणि आकाश सोळंकी आणि एलिझाबेथ वालंज यांनी गायलेल्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत असलेल्या “सूरज हुआ मधम” या गीताला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. त्याचबरोबर कुण्या गावाचं आलं पाखरू आणि बाई माझी करंगळी मोडली या लावण्या प्रेकषकांना विशेष भावल्या. चिंतन मोढा, अमन सैयद, हर्षद गणबोटे, आसिफ खान इनामदार या वादकानी प्रेकषकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि गायन आकाश सोळंकी यांनी केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक पपीषकुमार ललगुनकर, शोभा कदम, आरती आठल्ये, रुचिरा गुरव यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास हेमंत उत्तेकर आणि शितल तसेच विक्रम क्रिएशन्स यांचे तंत्र सहाय्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये