सुराविष्कार पुणे आयोजित मनपसंत गीतांचा एकोणिसावा भाग नुकताच संपन्न

पुणे | सुराविष्कार पुणे आयोजित शरमा के ना जा या मनपसंत गीतांचा एकोणिसावा भाग नुकताच नवी पेठ येथे असलेल्या शिक्षक भवनामध्ये पार पडला. यावेळी पुण्यातील गायक अशफाक शेख आणि एलिझाबेथ वाळंज यांनी आपली कला सादर केली. याप्रसंगी एलिझाबेथ यांनी गणेश भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. मुझे ईश्क है तुझीसे हे कार्यक्रमातील प्रथम गीत अशफाक शेख यांनी सादर केले. यानंतर गायलेल्या “अय हूस्न जरा जाग तुझे इश्क जगाए आणि दिलके झरोके में तुझको बिठाकर” या गीताला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या गीताला बक्षिसही मिळाले.
एलिझाबेथ वाळंज यांनी गायलेल्या “पान खाए सैंया हमारो” या गीताला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल वाघ यांनी केले. या कार्यक्रमास ध्वनी व्यवस्था राजेंद्र किरवे यांची लाभली, तर विक्रम क्रिएशन्स यांचे तंत्र सहाय्य लाभले. सदर कार्यक्रम मेलडीज् ऑफ गोल्डन एराच्या वतीने दृकश्राव्य स्वरूपात सादर करण्यात आला.