Top 5महाराष्ट्ररणधुमाळी

पंकजा मुंडेंनी नव्या पक्षाची स्थापना केली तर…- इम्तियाज जलील 

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली होती. अशातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी तिकीट न दिल्यामुळे पंकजा मुंडे यांनी स्व:तचा पक्षा काढावा हा माझा सल्ला आहे. मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांना भविष्य आहे. त्यांच्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव आहे. गोपीनाथ मुंडे यांना माणणारा खूप मोठा वर्ग असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषद दिली नाही तर फक्त नाराजी कशाला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला रामराम ठोकून नव्या पक्षाची घोषणा करायची असती. त्या ओबीसीच्या नेत्या म्हणून उभ्या राहतील तेव्हा त्यांच्या मागे किती मोठी ताकद उभी राहील हे पाहायला मिळेल, असंही जलील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये