‘जी 20’ शिखर परिषदेमुळे पुण्याचे होणार सुशोभिकरण!
पुणे : सध्या मेट्रोच्या कामामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतून कोंडी पहायला मिळत आहे. रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे, उघडे चेंबर, अरुंद रस्त्ये, स्वच्छतेच्या बाततीत देखील खुप उणिवा जाणवत आहेत. मात्र, पुढील वर्षी पुण्यात होणाऱ्या ‘जी 20’ या शिखर परिषदेमुळे तरी किमान काही दिवस शहराला सर्व गोष्टींनी नटलेले समृद्धीचे दिवस पहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘जी 20’ शिखर परिषदेला आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या 20 देशाचे अर्थमंत्री, गव्हर्नर, उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर शहराचे सुशोभिकरण करण्याचा खटाटोप महापालिकेकडून करण्यात येत आहे. पुढील आर्थिक वर्ष 2023 मध्ये ‘जी 20’ परिषदेचे आयोजन भारत पुणे शहरात करणार आहे.
शहरात गेल्या दीड वर्षापासून खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मेट्रोसारख्या विकासकामामुळे खोदकाम ठिकठिकाणी केलेले खोदकाम, निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र, शिखर परिषदेच्या निमित्ताने शहराचे सुशोभिकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतलं आहे. पथ दिवे, कचरा, नाल्या, रस्त्यांचे डांबरीकरण, चौकांची रंगरंगोटी, सांडपाणी या सर्व गोष्टीवर कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही दिवस तरी पुणेकरांना चांगले दिवस पहायला मिळणार आहेत.
भारतात होत असलेल्या या शिखर परिषदेत एकूण २१३ बैठका होणार असून, त्यापैकी १३ बैठका या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन शहरांत होणार आहेत. त्यापुर्वी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काही आठवड्यांपूर्वीच एक बैठक महापालिका शहराचे सौंदर्यीकरण व स्वच्छते संदर्भात आदेश दिले आहेत.