ताज्या बातम्यापुणेशेत -शिवार

हजारो हातांनी आशीर्वाद देणार ‘वृक्ष गणेश’

अनोखा संकल्प : देशी वृक्षांचे मोफत वितरण

पुणे : गणेश उत्सव हा पर्यावरण पूरक करावा हा संदेश अनेक जण देतात परंतु पर्यावरणाचे रूप घेऊनच हजारो हाताने गणेशाचे आशीर्वादाचे रूप साकारण्याची अनोखी किमया पुण्यातील माय अर्थ फाउंडेशन लायन्स क्लब आणि शिवोदय मित्र मंडळाने साकारली आहे. प्राध्यापक अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्था वाई यांच्या सहकार्याने वसुंधरा गणेशोत्सवाच्या आयोजनात गणेश मंडळांनी १००० देशी वृक्षांची आणि बियांचे वाटप करण्याचे अभियान चालवले आहे. गणेश दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला हे देशी झाड मोफत मिळणार आहे त्यामुळे देशी वृक्षाच्या माध्यमातून गणेशाची कृपा हजारो भक्तांवर होणार असून या वृक्ष दत्तक योजनेचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत समाजात अजून प्रबोधन होणे आवश्यक आहे. सध्या जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गचक्र बदलत आहे. मान्सून चक्रसुद्धा बदलले आहे. महापूर, भूस्खलन यासारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक सण हे पर्यावरणपूरक कशा पद्धतीने साजरा करता येईल हे पाहणे सध्याच्या काळामध्ये योग्य आहे. निसर्ग धर्म जास्तीत जास्त वाढावा आणि वसुंधरा मातेचे रक्षण व्हावे यासाठी नित्य वसुंधरा गणेशोत्सव राजरा केला जाणार आहे.
— सुभाष डांगे , चे संस्थापक, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त

नागरिकांना कोणतेही देशी झाड मोफत मिळणार आहे. त्यासाठी वृक्षारोपण करण्याच्या जागेचा खड्डा पाहूनच वृक्ष दत्तक योजना राबवून वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरणप्रेमी आणि गणेशमंडळांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी उपक्रमाचे आयोजक लायन्स क्लबचे राज मुछाल, तुळशीबाग मंडळाचे राजेश दातार, माय अर्थचे ललित राठी, शिवोदय मित्र मंडळाचे दिनेश भिलारे, हितेंद्र सोमाणी, अ‍ॅड. नरेंद्र निकम उपस्थित होते.

माय अर्थचे अनंत घरत म्हणाले की, प्रत्येक सण निसर्गाशी निगडित असतो. निसर्गाचे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणे हाच सर्व सणांचा मूळ उद्देश असतो. गणेशोत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे अपेक्षित आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे यावर प्रत्येकाने बारकाईने लक्ष देणे आवश्यक बनलेले आहे.

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करण्याचा आग्रह यानिमित्त धरण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये